दुध, दूधावरील साय मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी खाणे योग्य आहे काय?
मधुमेह असलेल्या रुग्णांनी दूध पिणे चांगले आहे कारण त्यात प्रोटीन आणि कॅल्शियम यांचे प्रमाण चांगले असते. परंतु कोणते दूध मधुमेह रुग्णांनी प्यावे यात बराच फरक आहे तो कसा हे मी थोडक्यात समजेल असे सांगतो.
आपण जेव्हा दूध पितो तेव्हा त्यात फॅट असते आता ह्या फॅट (fat) च्या मात्रेनुसार कोणते दूध मधुमेह असणार्या व्यक्तीला चांगले हे ठरते.
मधुमेह असणार्यांना कमी फॅट किंवा फॅट विरहित दूध पिणे चांगले.
दुधावरची साय म्हणजे संपूर्ण फॅट असल्यामुळे ती खाणे मधुमेह असणार्यांनी टाळावं. या शिवाय दुधापासून बनवलेले पदार्थ जसे की दही, ताक हे मधुमेह असणार्यांना घेणे चांगले आहे परंतु तूप, लोणी, बटर, चीज, घी ईत्यादी खाणे टाळावं.
आता बाजारात मिळणार्या दुधामध्ये बरेच प्रकार आहेत. ते म्हणजे टोन दूध, डबल टोन दूध आणि स्कीम दूध.
हे सांगण्याआधी प्रथम लक्षात घ्या की म्हशीच्या दुधात फॅट हे जवळपास 6% असते तर गायीच्या दुधात ते जवळपास 3% असते त्यामूळे गायीचे दुध हे मधुमेह असणार्यांना पिणे चांगले म्हशीच्या दुधाहून.
सर्वात कमी फॅट असणारे दूध म्हणजे स्कीम दूध हे मधुमेह किंवा हृदय विकार असणार्यांना पिणे सर्वात चांगले. स्कीम दुधात अगदी नगण्य म्हणजे 0.5% हून कमी फॅट असते.
डबल टोन दुधात फॅट ची मात्रा जवळपास 1.5% तर टोन दुधात ही मात्रा जवळपास गाई च्या दुधा इतकी म्हणजे 3% एवढी असते.
त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह असल्यास तुम्ही गाईच किंवा म्हशीचे दूध पीत असाल तर दूध उकळून साय बाजूला काढून ठेवा.
स्कीम दुधाचे काही फायदे खाली नमूद करतो :-
- वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
- लट्ठपणाशी संबंधीत असलेले प्रॉब्लेम आणि छातीत जळजळ, ऐसीडीटी नियंत्रण
- आतड्याच्या कर्करोगाची रिस्क कमी होते
- मधुमेह आणि हृदय विकाराचा धोका कमी होण्यास मदत
- मधुमेह असणार्यांना दुधाचा सर्वात चांगला पर्याय
- हाडे ठिसूळ होणे (osteoporosis) यात जास्त प्रथिने, कॅल्शियम आणि कमी फॅट असणे उपयुक्त.
तुम्हाला जर मी दिलेली माहिती उपयोगी वाटल्यास आमच्या फेसबुक पेज ला लाइक करा आणि हे उत्तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा
धन्यवाद
जय हिंद जय महाराष्ट्र
डॉ निखिल प्रभु
मधुमेह स्पेशलिस्ट
मुंबई