हो पण आणि नाहीं पण.
जर एखाद्या मधुमेह रुग्णाची रक्ताची साखरेची पातळी नॉर्मल रेंज मध्ये आहे आणि त्याला बाकीचे आजार जसे की रक्तदाब, रक्तातील चरबी (cholesterol) नियंत्रणात असेल आणि कोणत्याही प्रकारचे हृदय विकार नसतील तर अशी व्यक्ति रक्तदान करू शकते मग ती टाइप 1 असो का टाइप 2 मधुमेह.
चांगले मधुमेह नियंत्रण म्हणजे तीन महिन्यांची साखरेची चाचणी (HbA1c <7) सात च्या खाली असणे आवश्यक आहे.
Image credit – janswsmi darpan
आता रक्तदानासाठी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.
- जर टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह असणारे ज्यांना इन्सुलिन ट्रीटमेंट चालु आहे त्यांच्या मध्ये जर शुगर नियंत्रण व्यवस्थित नसेल किंवा इन्सुलिन डोस एडजस्ट केले नसतील तर रक्तदान करतेवेळी “लो किंवा शुगर डाऊन” व्हायची शक्यता असते. आणि काही वेळा शुगर डाऊन (Hypoglycemia) होणे फारच रिस्की ठरू शकते.
- ज्या मधुमेह रुग्णांना हृदय विकार आहे ते रक्तदान करण्यास पात्र नाहीत कारण हे जीवघेणे ठरू शकते.
- प्री – डायबिटीस असणारे रक्तदान करू शकतात परंतु त्यांना कोणताही हृदय विकाराचा इतिहास नको.
- सामान्यतः ज्या मधुमेह रुग्णांची औषध मात्रा गेल्या महिन्याभरात एडजस्ट केली आहे किंवा मधुमेह च्या गोळ्या बदलल्या आहेत अशा व्यक्ति मध्ये रक्तदान थोडे रिस्की आहे.
- याशिवाय काही मोठ्या सर्जरी जशा ट्रांसप्लांट (pancreatic transplant) वगैरे झाल्या असतील तर रिस्क जास्त असते. त्यामुळे शक्यतो रक्तदान करण्यापुर्वी च्या गेल्या 3 महिन्यात कोणतीही मोठी शस्त्रक्रिया झालेली नसावी.
- या शिवाय बाकी रक्तदानासाठी जे नियम आहेत ते सर्व पालन करणे आवश्यक आहेच.
माझे उत्तर आपणास आवडल्यास ते नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
धन्यवाद