सफरचंद दालचिनी सोया शेक – मधुमेह आहार मराठी

सफरचंद दालचिनी सोया शेक – 

आजची मधुमेह स्पेशल रेसिपी मध्ये आपण आज सफरचंद शेक बनवणार आहोत जो आरोग्याला चांगला आहे. यात आपण मधुमेह रुग्णांची रक्ताची पातळी नियंत्रणात राहील याचा विचार केला आहे.

ह्यात दालचिनी चा वापर केल्याने मधुमेह किंवा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. याशिवाय सालासकट सफरचंद घेतल्याने यात सोल्यूबल फायबर ची मात्रा वाढते त्याने एक जेल सारखे मिश्रण पोटात तयार होऊन कोलेस्टेरॉल व शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत होते.

ही माहिती मी एका व्यक्तीला पुरेल ह्या हिशेबाने लागणार्‍या सामग्री चे वर्णन करत आहे.

सफरचंद दालचिनी सोया शेक

 

साहित्य :

  • सफरचंदाचे तुकडे साली सकट न सोललेले ( अर्धा कप)
  • दालचीनी पाउडर (एक चिमुट)
  • थंडगार सोया मिल्क / लो फॅट मिल्क (एक कप)
  • साखरेचा पर्याय / स्टीवीया / पर्यायी (एक चमचा)

कृती किंवा तयार करण्याची पद्धत :

  • सगळे पदार्थ मिक्सर मध्ये एकत्र करा आणि मिश्रण बारीक आणि फेसाळ होई पर्यंत मिश्रित करा
  • तयार झालेला शेक ग्लास मध्ये ओता
  • त्वरित खाऊ घाला

तुम्हाला जर ही रेसीपी आवडली असल्यास तुमच्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद

 

मधुमेहाच्या रुग्णाने चपाती खाणे योग्य की अयोग्य?

माझ्या मता नुसार मधुमेह किंवा डायबिटीस असणार्‍या व्यक्तीने चपाती खाणे योग्य आहे.

ते का योग्य आहे हे मी आपणास समजावण्याचा प्रयत्न करतो.

येथे आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल जो भारतीय संस्कृती वर आधारित आहे.

भारतातील बहुतांश लोक म्हणजे अगदी 99% लोक कार्बोहाइड्रेट (carbohydrates) भरपूर प्रमाणात खातात. तो आपल्या आहाराचा अविभाज्य घटक आहे.

credits-wikipedia

छायाचित्र – विकिपीडिया

भारतात बहुतांश लोकांचा आहार जवळपास 75-80% हा कार्बोहायडेट्स (carbohydrates) वर आहे. यात सरल कार्बोहाइड्रेट (simple carbs) अणि जटिल कार्बोहाइड्रेट (complex carbs) हे दोन्ही येतात.

म्हणजे यात चपाती भाकरी भात हे सर्व आल.

जेव्हां आपण म्हणतो की ज्वारी बाजरी भाकरी खातो ते पण आले.

मधुमेह असलेल्या व्यक्तीने हे कार्बोहाइड्रेट चे प्रमाण आहारात कमी करणे गरजेचे आहे. पण भारतीय आहारात काही केल्या हे प्रमाण कमी करणे शक्‍य नाही.

त्यामुळे आपण हे प्रमाण कमी करून ते 50-55% आणणे गरजेचे आहे. कारण आपल्या आहारात ते त्याहून कमी करणे जवळपास अशक्य आहे.

अणि जरी एखाद्याने म्हंटले की मी कमी करतो तरी ते 4–6 महिने तो करेल पण आयुष्यभर करणे शक्य नाही. हे मी सामान्य जनतेला (जनरल पब्लिक) यांना अनुसरून म्हणतोय. (फिल्मस्टार किंवा सेलिब्रिटी त्यात येत नाही – ते लाख रुपये देऊन पर्सनल आहार तदन्य dietitian ठेवू शकतात). पण जो व्यक्ती 9 ते 5 ड्यूटी करून घरी येतो त्याला हे शक्य नाही.

माझे पेशंट हे सामान्य माणूस (common man) असतात त्यामुळे मला असे भलते सलते सल्ले देता येत नाही. कारण मला त्यांचा मधुमेह त्यांची रोजी रोटी सांभाळून नियंत्रणात ठेवावा लागतो.

Gluten बदल मी नंतर सविस्तर चर्चा करेन पण माझ अस प्रामाणिक मत आहे की नॉर्मल सामान्य (कॉमन) माणसाने असल्या भानगडीत पडू नये आणि आपल्या नेहमीच्या आयुष्यात कसा आणि किती बदल (lifestyle modification) आणता येईल की जेणेकरून वजन कमी होईल यावर भर द्यावा.

मधुमेह रुग्णांनी प्रामुख्याने स्वताचे लक्ष्य हे सकस आहार आणि नियमित व्यायाम करून वजन कमी करण्यावर द्यावे. आहारात काय गोष्टी घ्याव्यात यासाठी तुम्ही माझा हा वीडियो पाहू शकता.

विडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनल ला subscribe करा.

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र

डॉ निखिल प्रभु

सर्वोत्कृष्ट मधुमेह आहार कोणता आहे ? – अंडी

अंडे हे शून्य कार्बोहायड्रेट, उच्च प्रथिने अन्न असणारा आहार आहे जे मधुमेह पासून पीडितासाठी परिपूर्ण नाश्ता म्हणून कार्य करते.
हे मायक्रोन्युट्रिएंट कोलिन चे उत्कृष्ट स्त्रोत आहे जे नवजात शिशूंच्या मेंदूच्या वाढीसाठी आणि स्मृती वर्धनासाठी महत्वपूर्ण आहे.
.

अंडे – type2madhumeh.com

निरोगी केसांना प्रोत्साहन देण्यासाठी यात बरेच सल्फर असणारी अमिनो ऍसिडस् आणि बायोटिन आहेत .
.
अंड्याच्या गरा मध्ये लोहाची बरीच मात्रा आहे कि जी लगेच शरीर वापरू शकतो. अंड्याचा गर फेकून देण्यात काही तथ्य नाही कारण बऱ्याच प्रयोगांनी हे स्पष्ट केलाय कि अंड्याचा गर आणि हृदय विकार यात काही साम्य नाही .
.
कसे खावे ?
.
अंड्याचे बरेच पदार्थ बनवता येऊ शकतात जसे कि अंडे आम्लेट, अंडा बुर्जी , हाल्फ फ्राय , उकडलेलं अंड सकारामबल एग, इत्यादी.
.
एक संपूर्ण अंडी किंवा दोन अंडी पांढरे = 6 ग्रॅम प्रथिने
.
रेकॉमेन्डेड डोसः
.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (एनआयएन) पौष्टिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आठवड्यातून 3 संपूर्ण अंडी शिफारस करतो.