मधुमेह हा एक वागणूक संबंधात असणारा आजार आहे. त्यामुळे तो टाळण्यासाठी आपल्याला मुळात वागणुक किंवा आचार सारणी बदलणे महत्त्वाचे आहे.यालाच आपण “लाइफ स्टाइल मोडिफाइड” करण असे म्हणतो.
पण हे झाले घटक जे आपण बदलू शकतो. याशिवाय काही घटक असे असतात की जे आपण बदलू शकत नाही उदाहरणार्थ वाढत वय, आशियाई रेस, पारिवारिक मधुमेहाचा इतिहास, इत्यादि.त्यामुळे आपण जे घटक बदलू शकतो त्यावर लक्ष्य देऊया.आता त्यात प्रामुख्याने खाली नमूद केलेल्या बाबींचा समावेश होतो.
- आपल्या आहारातून साखर आणि सरल कार्बोहाइड्रेट कमी करावे.
- नियमितपणे व्यायाम करावा. म्हणजे बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नये. निदान दिवसात 40 मिनिटे तरी चालावे.
- आपला प्राथमिक पेय म्हणून पाणी किंवा ताक प्यावे. याशिवाय उन्हाळ्यात शक्यतो भरपूर पाणी प्यावे.
- वजन जास्त असल्यास किंवा लठ्ठपणा असल्यास वजन कमी करावे.
- धूम्रपान करू नये. दारू चे प्राशन कमी करावे.
- तळलेल्या गोष्टी टाळावे आणि भाजलेले किंवा उकडलेले अन्नपदार्थ आहारात समावेश करावेत.
- उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवावे. रक्तदाबाचा गोळ्या वेळे वर घ्याव्यात. विसरू नये.
- जर तुमचं वय वर्षे चाळिशीच्या पुढे असेल तर निदान सहा महिन्यातून एकदा शुगर तपासणी नक्की करावी. म्हणजे बॉर्डर लाइन प्री – डायबिटीज निघाल्यास वजन कमी करून वाढ थांबवू शकतो.
- जर तुमच्या घरातील कोणाला मधुमेह असल्यास तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका संभवतो, अशावेळी नियमित तपासणी, व्यायाम, सकस आहार आणि वजन कमी करण्यावर जरा जास्त लक्ष द्या.
- कोलेस्टेरॉल वाढणे, रक्तदाब वाढणे, वजन वाढणे हे देखील “मेटबोलीक सीनड्रम ” चा भाग आहे त्यामूळे ते नियंत्रणात ठेवून स्वतः ‘सडपातळ’ राहणे हाच मधुमेह पासून वाचण्याचा उपाय आहे.
धन्यवाद🙏
Facebook Comments