मधमाशी डंख उपचार पध्दतीने मधुमेहावर खरच चांगला परिणाम होतो का?

मधमाशी डंख उपचार पध्दती

माझ्या मते हा केवळ वेडेपणा आहे.

कारण ह्या मागे काहीतरी लॉजिक असणे आवश्यक आहे.

याच उत्तर देण्याआधी आपण विचार केला पाहिजे की मध माशीच्या डंखामध्ये नक्की काय असत. मला ही अगदी इत्थंभूत माहीत नव्हत केवळ hyaluronidase हे असत अस माहीत होत.

छायाचित्र – विकिपीडिया

तर चला पाहूया.

मी गूगल केल की मधमाशीच्या डंख यात नेमक काय आहे.

त्यातून मला अस कळल की मध माशीच्या डंख यात

हिस्टामाईन, मास्ट सेल डीग्रांन्युलेटिंग पेपताईड, मेलीटीन, फोसफोलायपेज A2, हायलूरोनीडेज आणि ऐसीड फोसफटेज,(histamine, mast cell degranulating peptide, melittin, phospholipase A2, hyaluronidase and acid phosphatase) ह्या गोष्टी असतात.

आता ह्या गोष्टींचा तसा पानक्रिया (pancreas), इन्सुलिन, आणि रक्तातील साखरेची पातळी ह्याच्याशी काही डायरेक्ट संबंध नाही किंवा निगडित ही नाही.

त्यामुळे मधुमेह उपचारात यांचा काहीही संबंध नाही.

माझे उत्तर आपणास आवडल्यास ते नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या फेसबुक पेज ला लाइक करायला विसरू नका

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र

Facebook Comments

डॉ निखिल प्रभु मुंबई आधारित सल्लागार मधुमेह विज्ञानी (मधुमेह स्पेशलिस्ट डॉक्टर) आहेत. डॉ निखिल प्रभु यांनी मधुमेह मध्ये पोस्ट ग्रॅड्युएशन कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अंधेरी पश्चिम येथे केले आहे. | सदस्यताः - महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल | इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) | एंडोक्राइन सोसायटी | मधुमेह संदर्भात ऑनलाइन whatsapp वीडियो consultation च्या appointment साठी 9082523295 या नंबर वर संपर्क करा

Leave a Comment