मधुमेह किंवा डायबेटिस असलेल्या रुग्णांनी कोणत्या चाचण्या कराव्या?

मधुमेह ह्या आजारात मुख्यतः रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. रक्त हे सर्व शरीरभर रक्तवाहिन्यांतुन फिरते सोबत ही वाढलेली साखर देखील सर्व शरीरात आणि अवयवांना पोहोचवते. हे अवयवांना इजा करू लागले की आपल्याला त्रास जाणवू लागतो. त्यामुळे मुळात ह्या रक्तातील वाढलेल्या साखरेचे नियंत्रण करणे आवश्यक आहे.

आता जेव्हा आपण मधुमेह नियंत्रण हा शब्द संबोधतो त्यात तपासणी आणि उपचार हे दोन्ही येत, सोबत आहार पथ्य आणि व्यायाम सुद्धा आला.

आपण आज तपासणी ह्याबद्दल जाणून घेणार आहोत.

साधारणतः मूत्रपिंड किंवा किडनीचा उंबरठा हा 180mg/dl इतका आहे. त्यापुढे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास साखर लघवी मध्ये येण्यास सुरू होते. ह्या उंबरठ्यात मधुमेह रुग्णांमध्ये बराच चढउतार होतो आणि साखर लघवीत येऊ लागते.

मधुमेह तपासणी

 

मधुमेह किंवा डायबेटिस असलेल्या रुग्णांनी खालील चाचण्या कराव्यात :-

मधुमेह रुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने खालील चाचण्या करून घ्याव्यात कारण काही वेळा खाली नमूद केलेल्या तपासण्यां व्यतिरिक्त आणखी काही तपासणीची गरज भासू शकते.

  • रिकामी पोटी रक्तातील साखरेची तपासणी (fasting blood sugar test) –

    ह्यात निदान 8-12 तासांचा उपवास असणे गरजेचे आहे. रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची मात्रा ही साधारण पणे 100-110mg/dl च्या खाली ठेवणे आवश्यक आहे. मधुमेह नियंत्रणात ह्या चाचणीचे मूल्य फार आहे कारण जर दिवसाची सुरुवातच जास्त साखरेच्या पातळीने होत असेल तर जेवणानंतर तर अजून रक्तातील साखरेची पातळी वाढेल त्यामुळे सर्वप्रथम ती नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

  • 2 तास जेवणानंतर रक्तातील साखरेची तपासणी ( 2 hr post prandial blood sugar test) –

    ह्या चाचणीत आपल्याला कल्पना येते की आपण जेवल्यावर साखरेचे प्रमाण किती वाढते. बहुतांश रुग्णांमध्ये ही चाचणी जास्त दाखवते कारण भारतीय लोकांच्या आहारात कार्बोहाइड्रेटचे प्रमाण जास्त असते. ही चाचणी करण्यापुर्वी तुमच्या मधुमेहाच्या नियमित गोळ्या घ्यायला विसरू नका.

  • ग्लायकोसायलेटेड हीमोग्लोबिन (HbA1c)-

    ही फार महत्वाची चाचणी आहे. ह्यात मागील तीन महिन्यांची रक्तातील साखरेची सरासरी कळते. ही चाचणी खाण्याच्या मात्रेने किंवा प्रकाराने बदलत नाही त्यामुळे ही जास्त विश्वासदायक आहे. चांगले मधुमेहाचे नियंत्रण म्हणजे ही चाचणी सात (HbA1c <7) च्या खाली ठेवणे. या व्यतिरिक्त अभ्यासातून असे लक्षात आले आहे की जो मधुमेह रुग्ण पहिले पाच वर्ष मधुमेहाच्या सुरवातीपासून ही चाचणी सात च्या खाली नियंत्रणात ठेवतो त्याला पाच वर्षानंतर जरी गोळ्या बंद केल्या तरी 95% कमी मधुमेहाचे दुष्परिणाम पुढील आयुष्यात शरीरावर होतात. ह्याला “लेगसी इफेक्ट” किंवा मेटबोलीक मेमरी असे म्हणतात.

  • सीरम क्रिऐटीनीन (serum creatinine) –

    ही देखील एक फार महत्वाची चाचणी आहे. साठीच्या पुढील रुग्णांनी ही निदान सहा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा तरी करावी. ह्या चाचणीत आपल्याला किडनीची कार्यक्षमता ह्याचा अंदाजा येतो. बर्‍याच मधुमेह च्या गोळ्या ह्या किडनीतून शरीराबाहेर टाकल्या जातात त्यामुळे जर किडनी नीट काम करत नसेल तर त्यांचा शरीरात संच होऊन शुगर लेवल खाली जाण्याची (Hypoglycemia) शक्यता वाढते.

  • लिपिड प्रोफाईल (Lipid Profile) –

    ही चाचणी रक्तातील चर्बीची मात्रा दाखवते. ह्यात कोलेस्टेरॉल, ट्रायगलीसेराइड आणि एल डी एल (LDL) ह्या गोष्टी कमी ठेवणे आवश्यक आहे. ह्याचे प्रमाण रक्तात वाढल्यास हृदय विकाराचा झटका येण्याचा संभव वाढतो. एच डी एल (HDL) हे चांगले कोलेस्टेरॉल असून ते वाढलेले असावे.

  • ह्याव्यतिरिक्त मधुमेह चाचण्या –

    वर नमूद केलेल्या मुख्य चाचण्यां व्यतिरिक्त डॉक्टर तुम्हाला बाकी काही चाचण्या गरजे नुसार करावयास सांगतात. ह्यात लघवीची तपासणी (Urine routine), छातीची पट्टी (ECG), छातीची फिल्म (Xray) ईत्यादींचा समावेश होतो.

तुम्हाला ह्या विषयी काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स मध्ये विचारा. मी मुद्दाम फेसबुक कमेंट्स पण ठेवल्या आहेत सोप्या पडाव्या म्हणुन.

माहिती आवडल्यास आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र

Facebook Comments

डॉ निखिल प्रभु मुंबई आधारित सल्लागार मधुमेह विज्ञानी (मधुमेह स्पेशलिस्ट डॉक्टर) आहेत. डॉ निखिल प्रभु यांनी मधुमेह मध्ये पोस्ट ग्रॅड्युएशन कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अंधेरी पश्चिम येथे केले आहे. | सदस्यताः - महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल | इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) | एंडोक्राइन सोसायटी | मधुमेह संदर्भात ऑनलाइन whatsapp वीडियो consultation च्या appointment साठी 9082523295 या नंबर वर संपर्क करा

1 thought on “मधुमेह किंवा डायबेटिस असलेल्या रुग्णांनी कोणत्या चाचण्या कराव्या?”

Leave a Comment